मिस् महाराष्ट्र किताब मिळविणाऱ्या नाशिकच्या स्टेफी मंडलसह दुर्गा जाधव, आशा थापा यांचा समावेश असलेला महाराष्ट्राचा संघ तामिळनाडू शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने चेन्नई येथे आयोजित आठव्या मिस् फिटनेस स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या खेळाडूंचा सत्कार येथील ऊर्जा हेल्थ आणि फिटनेस हबचे संचालक अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मिस् फिटनेस स्पर्धा दोन गटांत होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्टेफी मंडल, दुर्गा जाधव आणि आशा थापा या नाशिकच्या खेळाडूंचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण ऊर्जा हेल्थ आणि फिटनेस हबमध्ये झाले. हबचे संचालक अजय बोरस्ते यांनी या खेळाडूंची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. भाऊसाहेब सोनवणे यांनी आशा थापाची जबाबदारी घेतली आहे. या खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी बोरस्ते यांच्यासह विलास गायकवाड, राजेंद्र सातपूरकर, अमित बोरस्ते, संतोष कहार, संजय घोडके, अनिल पाटील, अपर्णा पाटील, भाऊदास सोनवणे, मंगल सोनवणे, सारंग नाईक आदी उपस्थित होते.