राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थिसेनेचा अध्यक्ष आशिष साबळेसह चार जणांस खडक पोलिसांनी अटक केली आहे. तर काळेवाडी व रहाटणी येथील रस्त्यावर टायर जाळून वाहणे अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर येथे राज ठाकरे यांच्या मोटारीच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. तर बुधवारी काळेवाडी व रहाटणी येथे टायर जाळून रस्ता आडविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी खडक व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच जणांस अटक केली तर खडक पोलिसांनी साबळेसह चार जणांस अटक केली आहे. या चार जणांस २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2013 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रवादी’चे कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थिसेनेचा अध्यक्ष आशिष साबळेसह चार जणांस खडक पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 01-03-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns worker arrested on charges of ncp office damage