एरवी रहस्य कथा, नामवंत लेखकांच्या कादंबऱ्या अशा विविधांगी पुस्तकांनी सजलेली पुस्तकांच्या दुकानाची दर्शनी बाजू आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांनी घेतली आहे. इतकेच नव्हे तर या पुस्तकांची मागणीही प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर आणि मतदानोत्तर चाचण्यांचा विचार करून काही पुस्तक विक्रेत्यांनी सर्वाधिक मागणी असलेल्या पुस्तकांच्या जादा प्रती मागावून ठेवल्या आहेत. देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच देशभरात मोदी लाट सुरू झाली. सोशल मीडियावरही ‘अब की बार मोदी सरकार’चे संदेश सातत्याने फिरत होते. याचदरम्यान मोदी यांच्या राजकीय प्रवासापासून ते त्यांच्या विविध भूमिकांचे वर्णन करणारी अनेक पुस्तके बाजारात आली. यातील ‘मोदी, मुस्लिम आणि मीडीया – व्हॉइस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी असल्याचे ‘किताब खाना’ पुस्तकालयाचे व्यवस्थापक संजीव कामत यांनी सांगितले. याचबरोबरीने ‘नमो स्टोरी’, ‘नरेंद्र मोदी पॉलिटीकल बायोग्राफी’ याही पुस्तकांना मागणी आहे. गेला एक महिना मोदी यांच्याशी संबंधित इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमधील विविध पुस्तकांच्या ३० ते ३५ प्रतींची रोज विक्री होत असतेच असेही कामत नमूद करतात. मतदानोत्तर चाचण्या आणि शुक्रवारच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर मागणी असलेल्या पुस्तकांच्या १०० ते १५० प्रती जास्तीच्या मागवून ठेवण्यात आल्याचेही ते सांगतात. मोदी यांच्यावरीलअनेक नवीन पुस्तके बाजारात आली. त्याला मागणीही आहे, मात्र मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण मॅजेस्टिक बुक डेपोचे अशोक कोठावळे यांनी नोंदविले.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
पुस्तकांच्या बाजारातही मोदीलाट
एरवी रहस्य कथा, नामवंत लेखकांच्या कादंबऱ्या अशा विविधांगी पुस्तकांनी सजलेली पुस्तकांच्या दुकानाची दर्शनी बाजू आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांनी घेतली आहे. इतकेच नव्हे तर या पुस्तकांची मागणीही प्रचंड वाढली आहे.
First published on: 16-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi wave in books market