निसर्गाने आपल्याला दिलेल्या पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे त्याचा दिवसेंदिवस विनाश होत आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी वेळीच काम सुरू केले होते. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्याचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. हाच उपक्रम पुढे सुरू राहावा यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाची गरज आहे, असे मत अनीस अहमद यांनी व्यक्त केले.
 दिवं. मोहन धारिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.  वनराई फाऊंडेशनच्या वतीने दिवं. डॉ. मोहन धारिया स्मृती चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनाचे १४ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले होते. ७ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षण या विषयावरील चित्र मागविण्यात आली होती.  यात एकूण ३५०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या चित्रकृतीचे या स्पर्धेसाठी मिळाल्या.  डॉ. धारियांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरी येथे चित्रकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले.  या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या वरेन्यम जोशी (प्रथम), हिमांशू अभ्यंकर (द्वितीय) आणि सुरभी बावणकर (तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले. तर यश अग्रवाल, अपर्णा पारधी, कृतिका जांगळे, सागर बनपेला, प्रथमेश लोणकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना नवराई फाऊंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. आशीष देशमुख गोपाळराव ठोसर, वनराईचे सदस्य अनंतराव धारड, प्रशांत वासाडे, नितीन विजयन अ‍ॅड. निशांत गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन जतकर यांनी केले. अ‍ॅड निशांत गांधी यांनी आभार मानले.