उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे येत्या ३० जून या कालावधीत विशेष जादा गाडय़ांची तजवीज केली आहे. बुलढाणा, यवतमाळ, मोर्शी, पांढरकवडा, अकोला, शेगाव, बीड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी नागपूरहून जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. शिवाय उमरेड, काटोल, रामटेक आणि सावनेर या स्थानकावरूनही जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ३८ जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. नागपूर ते बुलढाणा ही बस सकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि ३.३० वाजता बुलढाण्याहून निघेल. मोर्शीला जाणारी गाडी ७.३० वाजता सुटेल आणि ११.३० वाजता तेथून सुटेल. प्रवाशांनी विशेष गाडय़ांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. बसेसचे आगाऊ आरक्षण तसेच अधिक माहितीकरता प्रवाशांनी आगार व्यवस्थापक यांच्याशी २७२६२०१, बसस्थानक प्रमुख २७२६२२१ किंवा मोरभवन बसस्थानक २५२२३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2014 रोजी प्रकाशित
उन्हाळ्यात जादा बसगाडय़ा
उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे येत्या ३० जून या कालावधीत विशेष जादा गाडय़ांची तजवीज केली आहे.
First published on: 04-04-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc releases excess bus in summer