मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या विभागाच्या वतीने अजित देशमुख लिखित ‘मुंबईला जातो मी’ या नाटकाचे प्रयोग केले जाणार आहेत. १२ ते १५ मार्च असे सलग चार दिवस सायंकाळी ७ वाजता कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी संकुल, सांताक्रुझ पूर्व येथे हे प्रयोग सर्वाना विनामूल्य पाहायला मिळतील. नाटकाचा शुभारंभ मुंबई विद्यापीठाच्या बी.सी.यू.डी.चे संचालक डॉ. राजपाल हांडे यांच्या हस्ते होईल.
प्रवेशिका अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा मजला, विद्यानगरी संकुल येथे कार्यालयीन वेळेत तसेच प्रयोगापूर्वी एक तास आधी मुक्ताकाश रंगमंच येथे उपलब्ध आहेत. प्रयोगाला प्रथेप्रमाणे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रथम वर्षांच्या अपूर्वा चौधरी, सायली चावरकर, अमोल गालफाडे, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, पायल कालरा, अशोक कानगुडे, स्नेहा काटे, प्रवीण खाडे, वृषाली खाडिलकर, शंतनू कोसंदर, अमर कुलकर्णी, सीमा रत्तू, तन्मय सावंत, शालिनी शर्मा, दीक्षा सोनावणे, नम्रता सुळे, अक्षय टाक, प्रशांत त्रिभुवन, सिद्धार्थ खिरीड, सुरलीन कौर या विद्यार्थ्यांचा नाटकात सहभाग आहे, अशी माहिती संचालक प्रा. शफाअत खान यांनी दिली. संपर्क डॉ. मंगेश बनसोड (९९२०४२०३८८), मिलिंद इनामदार (९८२०६८६५०६) अथवा अमोल देशमुख (९३२५३४०७०६)