‘आशिकी २’द्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी शक्ती कपूरची कन्या श्रद्धाच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही. उलट ती म्हणतेय की माझी स्पर्धा स्वत:शीच आहे.
गेल्या काही वर्षांत कलावंतांच्या कन्या-पुत्र मोठय़ा प्रमाणावर चित्रपटांतून झळकताना दिसत आहेत. त्याचबरोबर नवोदित कलावंतांमध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना दिसून येते. यश मिळाले तर त्याची हवा डोक्यात जाते असेही कलावंत पाहायला मिळतात. परंतु, शक्ती कपूरसारख्या प्रस्थापित खलनायकाची कन्या असलेली श्रद्धा कपूर मात्र म्हणतेय की माझी स्पर्धा अन्य कुणा अभिनेत्रीशी नाही तर मी स्वत:शीच स्पर्धा करतेय. माझे काम, माझा अभिनय यावरूनच माझी ओळख तयार होईल. माझ्या पहिल्याच चित्रपटाच्या यशामुळे आई-बाबांना खूप आनंद झालाय आणि त्यांच्याचेहऱ्यावरचा आनंद पाहून मला आनंद झालाय, असेही ती म्हणाली. ‘शूटआऊट अॅट वडाळा’द्वारे श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूरनेही रूपेरी पडद्यावर आगमन केले असून त्याचा चित्रपटही सुपरहिट झाल्याने एकंदरीत शक्ती कपूर खानदानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. करण जोहर निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटातही श्रद्धाला प्रमुख भूमिका मिळाली असून करिना कपूर आणि इम्रान खान हे कलावंतही झळकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2013 रोजी प्रकाशित
माझी स्पर्धा स्वत:शीच – श्रद्धा कपूर
‘आशिकी २’द्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी शक्ती कपूरची कन्या श्रद्धाच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही. उलट ती म्हणतेय की माझी स्पर्धा स्वत:शीच आहे. गेल्या काही वर्षांत कलावंतांच्या कन्या-पुत्र मोठय़ा प्रमाणावर चित्रपटांतून झळकताना दिसत आहेत.
First published on: 19-05-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My competition with me only shraddha kapur