महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या (दि.२३) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’ असे नामकरण होत आहे. भास्करगिरी महाराज व जंगलेशास्त्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.
बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सेनाप्रमुख ठाकरे हयात असतानाच त्यांचे नाव या इमारतीला द्यावे, असा प्रस्ताव मनपाला दिला होता. महापौर शीला शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी, तसेच महापालिकेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. आमदार अनिल राठोड, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे पक्षाच्या बैठकीसाठी उद्याच मुंबईत असल्याने ते या कार्यक्रमाला नसतील.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2013 रोजी प्रकाशित
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’
महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या (दि.२३) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’ असे नामकरण होत आहे. भास्करगिरी महाराज व जंगलेशास्त्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.
First published on: 23-01-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naming ceremony of balasaheb thackeray bhavan today