नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आदिवासी राहत असून त्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी महानगरपालिका त्यांना घरे बांधून देणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात आदिवासीसाठी घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव २००७ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने आदिवासींना घरे बांधून देण्यात आली आहे. आता अडवली-भुतवली येथील आदिवासींना २२ घरे बांधून देण्यात येणार असून २६९ चौ.फुटांची ही घरे असतील. यासाठी सुमारे ८५ लाख रुपये खर्च होणार आहे.