महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पडलेला दुष्काळ संपवायचा असेल तर वेगवेगळ्या उपायांबरोबरच शिवकालीन जलनितीचा अवलंब केला पाहिजे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या विषयावरील कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी मांडले.
रायगडावरील गंगासागर तलाव, प्रतापगडावरील तटबंदीजवळील जलस्त्रोत असलेले खड्डे म्हणजेच पाण्याच्या टाक्यांची निर्मिती, छपरावरील पन्हाळीने खोलगट भागात पाणी साठविणे आदी उपायांचा अवलंब प्रत्यकाने तसेच राज्यकर्त्यांनीही करावा, असे मत अनुराधा खोत, प्रा. महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
खोत म्हणाल्या की, मोठी धरणे आणि तळी यांच्यामुळे पाण्याचा समतोल बिघडतो. त्यामुळे या ऐवजी छोटी शेततळी आणि धरणे बांधली तर पाण्याच्या नक्कीज जास्तीत जास्त वापर करता येईल. त्याचा उपयोग भविष्यातील पाण्याची टंचाई भासू नये, त्यासाठी होऊ शकतो .