कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने एक दिवसात १२ लाख ४ हजार लीटर दूधविक्री करण्याचा नवीन उच्चांक केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्री १ लाख ४ हजार लीटरने जादा आहे. गोकुळमार्फत मुंबई, पुणे, कोकण तसेच कोल्हापूर परिसरामध्ये गोकुळ या नावावर दुधाची विक्री करण्यात येते. ईद व सणासुदीच्या काळात गोकुळने जास्तीत जास्त दूध विक्री करण्याचा प्रत्येक वर्षी नवीन उच्चांक केलेला आहे. गोकुळने गुणवत्तेबद्दल कदापिही तडजोड केलेली नाही म्हणूनच गोकुळ ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचा मानकरी ठरला आहे. नजीकच्या काळात गोकुळ दिवसाला १५ लाख लीटर्स दूध विक्री करेल असा विश्वास अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2013 रोजी प्रकाशित
गोकुळ’चा एक दिवसात दूधविक्रीचा नवा उच्चांक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने एक दिवसात १२ लाख ४ हजार लीटर दूधविक्री करण्याचा नवीन उच्चांक केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्री १ लाख ४ हजार लीटरने जादा आहे.
First published on: 10-08-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New record of milk sale in one day of gokul