विद्यापीठाची नव वर्षांची सुरूवात नव्या कुलसचिवांसमवेत होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी सांगितले.
विद्यापीठाचे माजी कुलसचिव मा. ल. जाधव यांनी जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर कुलसचिव पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. चंद्रशेखर चितळे सांभाळत आहेत. कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया सध्या सुरू असून सध्या २३ अर्जाची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. कुलसचिव पदासाठीच्या मुलाखती जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गाडे यांनी दिली. त्यामुळे आता नवे कुलसचिव कोण यावर विद्यापीठामध्ये तर्कवितर्क आणि चर्चा रंगल्या आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या गेल्यावेळच्या बैठकीमध्ये कुलसचिव पदाची निवड समिती नेमण्यात आली आहे.
व्यवस्थापन परिषदेची बैठक २२ नोव्हेंबरला झाली होती. या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेतील अनेक विषय शिल्लक राहिल्याने मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नॅशनल लॉ स्कूलबाबत चर्चा होणार आहे. या विषयावर व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुणवत्ता सुधार कार्यक्रम, विद्यापीठातील मनुष्यबळाचा आढावा, भरती प्रक्रिया या विषयांवरही या बैठकीमध्ये चर्चा होणार
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
विद्यापीठाचे नवे वर्ष नव्या कुलसचिवांबरोबर
विद्यापीठाची नव वर्षांची सुरूवात नव्या कुलसचिवांसमवेत होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी सांगितले.
First published on: 04-12-2012 at 04:29 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year of university with new kulsecretary