ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये हार्ट -वॉस्क्युलर सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले. यामुळे वॉस्क्युलर सर्जन, कार्डिओलॉजिस्ट व इंटरवेशनल रेडिओलॉजिस्ट सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. हार्ट-व्ॉस्क्युलर सेंटरमध्ये कॅथ प्रयोगशाळेचा समावेश करण्यात आला आहे. नायर हॉस्पिटल प्रा. लि. चे संचालक डॉ. जय देशमुख यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी शंकर नारायण नम्बुदिरी प्रामुख्याने उपस्थित होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल, व्ॉस्क्युलर सर्जन डॉ. रोहित गुप्ता, डॉ. सचिन ढोमणे यांच्यासह उदयभास्कर नायर, डॉ. उषा नायर, डॉ. अनुप मरार, डॉ. वंदना टोमे, डॉ. राजेश अटल, डॉ. सुधीर टोमे, डॉ. देवयानी बुचे, डॉ. नंदू कोलवाडकर आदी उपस्थित होते.