शहरातील नागरिकांना विविध मूलभूत सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा कार्यालयासमोर धरणे धरले.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पावसाळ्यातही भेडसावत आहे. शहरातील खड्डेमय रस्ते, सार्वजनिक आरोग्याबाबत दयनीय अवस्था व समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करावा, किमान दोन दिवसांत एकदा पाणी द्यावे, रस्ते बांधणी करावी, आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करावे, महापालिके अंतर्गत शाळांची दुरवस्था थांबवावी, शहरातील तुंबलेले नाले व गटारे साफ करावेत, येलदरी धरणातून होणाऱ्या विस्तारीत पाणीयोजनेचे काय झाले याचा खुलासा करावा, आदी मागण्यांसाठी सोमवारी मनसेने धरणे आंदोलन केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे, बालाजी देसाई, शेख राज, विश्वास कऱ्हाळे, खंडेराव आघाव, सचिन पाटील, सुशीला चव्हाण, अमोल देवठाणकर, वैशाली परिहार, सुनिता कोळी आदी कार्यकत्रे सहभागी झाले होते.