उरण शहरात मुख्य नाक्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्डय़ांमुळे वाहनचालकांचा प्रवास खडतर झाला आहे. खड्डय़ांचा त्रास चालकांसह प्रवाशांनाही होत आहे. मे महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम केल्यानंतरही पहिल्याच पावसात रस्त्याला खड्डे पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उरण शहर जेमतेम अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात वसलेले आहे. शहराच्या कोटनाका आणि उरण एसटी स्टॅण्ड चारफाटा या दोन्ही प्रवेशद्वारात नेहमीच खड्डे पडलेले असतात. त्याचप्रमाणे, कामठा रोड, आपला बाजार नाका येथेही खड्डे पाहावयास मिळते. उरण ते मोरा या रस्त्यात सध्या खड्डा आणि रस्ता याचा शोध घेऊन वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. मोरा रस्त्याचीही दुरुस्ती मे महिन्यातच केली असतानाही या रस्त्यालाही खड्डे पडलेले आहेत. खड्डे दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने हे खड्डे पुन्हा पडत असल्याचे येथील रहिवाशी सुरेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या संदर्भात उरणचे नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2015 रोजी प्रकाशित
शहरातील नाक्यांवर रस्त्यांना खड्डे
उरण शहरात मुख्य नाक्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्डय़ांमुळे वाहनचालकांचा प्रवास खडतर झाला आहे.

First published on: 10-07-2015 at 07:14 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on roads