बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली असून, मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली, तरी संबंधित मुख्याध्यापिकेने अद्याप याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही.
संबंधित मुख्याध्यापिका गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी शाळेच्या परिसरातच विषारी औषध प्राशन केले. या प्रकारामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. हा प्रकार शाळेतील त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. मात्र, अद्याप संबंधित मुख्याध्यापिकेने या प्रकराबाबत किंवा त्याच्या कारणाबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. दरम्यान, शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ व मुख्याध्यापिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
बिबवेवाडीत शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली असून, मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
First published on: 09-11-2012 at 04:37 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Principle try to commit suicide