येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या धरणे आंदोलनात पाणीप्रश्नी सरकारला जाब विचारणार असल्याचे जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विभागातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर जनता विकास परिषदेतर्फे २० ऑक्टोबरला दुपारी १२ ते ३ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
काब्दे यांनी आखाडा बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. आंदोलनाचा रेटा असल्याशिवाय सरकारला जागच येत नाही. त्यामुळे या आंदोलनाचे आयोजन केले आहे. आंदोलनात मोठय़ा संख्येनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जनता विकास परिषदेने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2012 रोजी प्रकाशित
पाणीपश्नावर सरकारला जाब विचारणार- काब्दे
येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या धरणे आंदोलनात पाणीप्रश्नी सरकारला जाब विचारणार असल्याचे जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
First published on: 16-10-2012 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question will be asked to govenment on water problem kabde