देशभरातील न्यायालयांमध्ये लाखो खटले प्रलंबित आहेत. उशीरा न्याय मिळणे हे न्याय नाकारल्याप्रमाणेच असते, तसेच त्यामुळे भ्रष्टाचारालाही पायबंद घालताना अडचणी येतात. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ‘फोरम फॉर फास्ट जस्टिस’कडून ३० जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनादिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नवी मुंबई आणि दहिसरकडून आझाद मैदानापर्यंत कार, स्कूटर यांची रॅली काढण्यात येईल.
या आंदोलनात आझाद मैदानात दुपारी दोन ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत व्याख्याने होतील तसेच व्याख्यानानंतर न्यायदानाच्या कामात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या बिलासपूर येथील प्रवीण पटेल यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.