जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून पाणी सोडावे, या मागणीसाठी उद्या (शुक्रवारी) शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. नगरमधील काँग्रेसचे व नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते पाणी सोडण्यास विरोध करीत असल्याने जनक्षोभ सरकारच्या लक्षात यावा, म्हणून मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते मनोहर जोशी करणार आहेत. त्यांच्यासमवेत सुभाष देसाई व अनंत गिते हे नेतेही मोर्चात सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला. त्यावेळी थोरातांच्या मदतीला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे धावले होते. या वेळी जिल्हाप्रमुख व खासदार खैरे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.