आझाद मैदान पोलिसांनी दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. तिने आपल्या साथीदारांसह दक्षिण मुंबईत दरोडे घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
रविवारी पहाटे आझाद मैदान परिसरातील एका हॉटेलमध्ये दरोडा घालण्यासाठी काहीजण आले होते. तेथील वेटरच्या सतर्कतेने हा डाव उधळला गेला. दरोडा घालायला आलेले आरोपी पळून गेले. मात्र एक महिला सापडली. फातिमा शेख असे तिचे नाव आहे. तिला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. तिने दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी दरोडे घातल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या दोन साथीदारांना ठाणे गुन्हे शाखा तसेच पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत आणखी काही सदस्य असून त्यांचाही शोध सुरू आहे. दरोडय़ाच्या टोळीत महिलेच्या सहभागाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
दरोडेखोर महिलेला अटक
आझाद मैदान पोलिसांनी दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. तिने आपल्या साथीदारांसह दक्षिण मुंबईत दरोडे घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
First published on: 01-02-2014 at 12:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber woman arrested