लोहा (जिल्हा नांदेड) येथील खासगी शिकवणीच्या विद्यार्थ्यांना वेरुळ, अजिंठय़ाची सहल करून परत जाणारी खासगी बस रविवारी मध्यरात्री माजलगाव शहराजवळ वळण रस्त्यावर उलटली. यात एका शिक्षकासह ७ विद्यार्थी जखमी झाले. अपघातात नवनाथ शंकर गिरी या शिक्षकासह अजय अशोक येवदेकर (वय १४), मयुरी लक्ष्मीकांत पालमकर (वय १६), सतीश अनंतराव पल्ले (वय १६), ओमकिरण चंद्रकांत शिलगे (वय १६), संदीप खांडेराव पवार (वय १३), मंडीवल्ले श्रीहरी भीमराव (वय १०), सुमंत संतोष गंडेवाल (वय १४) हे विद्यार्थी जखमी झाले.