शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यातील मुरंगलच्या जंगलात आज सकाळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली.
सुरक्षा दलाच्या ३७ व्या तुकडीचे सुमारे शंभर जवान आज पहाटे लाहेरीजवळच्या मुरंगलच्या पहाडीवर शोधमोहीम राबवित असतांना सकाळी नऊच्या सुमारास ही चकमक उडाली. जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी प्रथम गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. सुमारे पंधरा मिनिटे दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
सुरक्षा जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक
शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यातील मुरंगलच्या जंगलात आज सकाळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली.
First published on: 28-11-2012 at 12:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security soldiers fights with naxalites