बदलापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. काटदरे मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींनाच स्थान देण्यात आले होते. शहरातील तब्बल सहाशे ज्येष्ठ नागरिकांना यानिमित्ताने पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. आमदार किसन कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शहरातील निराधार वृद्धांना आधार देण्याचे आश्वासन यावेळी संयोजकांच्या वतीने देण्यात आले. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत ज्येष्ठ नागरिकांची विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा केली जाईल. तसेच तिथे जाण्या-येण्याचीही व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाहीही यावेळी कथोरे यांनी दिली. वयाची १०१ वर्ष पूर्ण केलेले सदाशिव जाधव (१०१), अभिमन्यू लंकेश्वर (८६), वसंत पोंक्षे (८७), चंद्रकांत धुमळे (८६), हिंमत मोरे (८५), श्रीधर ठाकरे (८४), वसंत जुवेकर (८६), हसाक मोहम्मद खान (८७), राम पुजारी (८२) आणि लक्ष्मण नलावडे (८१) हे ज्येष्ठ नागरिक यावेळी व्यासपीठावर विराजमान झाले होते. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिथुन कोशिंबे, जनार्दन डायरे, नंदकुमार कांबळे, राजेश पाटील, साकिब गोरे, उत्तम विशे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
बदलापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. काटदरे मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींनाच स्थान देण्यात आले होते.
First published on: 13-06-2013 at 01:17 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizens honored on the occasion of ncp anniversary