अंबरनाथ पूर्व विभागातील शिवाजी चौकातील पालिकेच्या मालकीची १३ दुकाने गुरुवारी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. नव्या आरक्षणानुसार डी.डी. स्कीम १५ मधील सव्‍‌र्हे नं. १०९ हा भूखंड वाहनतळासाठी राखीव आहे. त्यामुळे खुल्या नाटय़गृहाची इमारत तोडून या ठिकाणी पालिका ९ कोटी रुपये खर्चून बहुमजली वाहनतळ उभारणार आहे.
या खुल्या नाटय़गृहालगत पालिकेने १९७७-७८ मध्ये बांधलेली १३ दुकाने तोडण्यात आली. पालिकेने ही दुकाने भाडय़ाने दिली होती. संबंधित व्यापाऱ्यांचा करार संपला होता. त्यामुळे कायदेशीर नोटीस देऊन पालिकेने ही कारवाई केली.
या बहुमजली वाहनतळ प्रकल्पामुळे अंबरनाथकर मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या मैदानास मात्र मुकणार आहेत.