सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे सहावे जिल्हा अधिवेशन शुक्रवारी (दि. २३) शहीद भगतसिंह हायस्कूल, बजाजनगर येथे होणार आहे. सिटूचे राज्य महासचिव डी. एल. कराड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी उद्धव भवलकर राहणार आहेत.
अधिवेशनात ३ वर्षांच्या कार्याचा अहवाल, कामगार वर्गासमोरील आव्हाने, केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी व मालकधार्जिणे धोरण, असंघटित कामगारांचे प्रश्न, कंत्राटी कामगारांना किमान वेतन, पी.एफ., इएसआय, बोनस, सुरक्षा व आरोग्य या सामाजिक सुरक्षेचा फायदा मिळत नाही. या सर्व प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता रांजणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभा होणार आहे. सभेस कामगार बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिटूच्या वतीने करण्यात आले आहे.