स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती, तसेच सिम्लीफाइड टेक्नॉलॉजीस फॉर लाइफ यांच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मशताब्दी समारोह वर्षांनिमित्त जिल्हय़ातील दीड हजार शालेय विद्यार्थ्यांना एकाच वेळी सूर्यचूल (सौर कुकर) बनविण्याचे प्रशिक्षण देण्यास चर्चासत्र आयोजित केले आहे. जिल्हय़ातील विविध शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभाग नोंदवू शकतात. शनिवारी (दि. १९) जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत विद्यार्थ्यांकडून सूर्यचूल बनवून घेण्यात येईल. याच सूर्यचुलीत अन्नपदार्थ शिजवले जाणार आहेत. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांमार्फत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी विवेक काबरा, सुरेश केसापूरकर, राजपाल पार्चा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे सुनील रायठठ्ठा, सुनील गोयल व प्रा. सोमीनाथ खाडे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
शालेय विद्यार्थ्यांसाठी सूर्यचूल प्रशिक्षणावर शनिवारी चर्चासत्र
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती, तसेच सिम्लीफाइड टेक्नॉलॉजीस फॉर लाइफ यांच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मशताब्दी समारोह वर्षांनिमित्त जिल्हय़ातील दीड हजार शालेय विद्यार्थ्यांना एकाच वेळी सूर्यचूल (सौर कुकर) बनविण्याचे प्रशिक्षण देण्यास चर्चासत्र आयोजित केले आहे.
First published on: 19-12-2012 at 02:46 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar stove training seminar on saturday for school student