भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित करताच त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. किती असेल त्याची व्याप्ती? मराठवाडय़ातील काही शहरात ‘मोदी लाओ, देश बचाओ’ चा नारा आता चक्क शंभर रुपयांच्या नोटेवर देण्यात आला आहे! अनेक नोटांवर पांढऱ्या भागात तसा तयार केलेला ‘शिक्का’ मारून मोदींचा करण्यात आलेला हा प्रचार नियमांचे उल्लंघन करणारा असला तरी अद्याप तरी यावर कोणी आक्षेप नोंदविलेले नाहीत.
नोटांच्या माध्यमातून होणारा मोदींचा प्रचार सध्या मराठवाडय़ात चच्रेचा विषय आहे. शंभराची नोट चलनात अधिक असल्याने त्यावर मारण्यात आलेले शिक्के रिझर्व बँकेच्या मागदर्शक तत्त्वानुसार गुन्हा ठरू शकतो, असे विधी क्षेत्रातील मान्यवर सांगतात. एरवी प्रचारादरम्यान आमिष म्हणून वापरलेली नोट प्रचाराचे माध्यमच झाली आहे. शंभराच्या नोटांवरच ‘मोदी लाओ, देश बचाओ’ चा नारा दिला जात आहे. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात या नोटा प्रामुख्याने आढळून येत आहेत. पंतप्रधानपदाचे मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोदींच्या विरोधात आणि बाजूने बोलणाऱ्यांची फौजच टिवटिव करू लागली आहे. त्यातच नोटांवर प्रचारांचे हे तंत्र ग्रामीण भागात पद्धतशीर पसरविले जात आहे. चलनावर काहीही लिहू नये, असे संकेत आहेत. अजून तरी या अनुषंगाने कोणाचाही आक्षेप नसल्याने नोटांच्या माध्यमातून मोदी प्रचार सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2013 रोजी प्रकाशित
शंभराच्या नोटांवर ‘मोदी लाओ देश बचाओ’चा शिक्का!
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित करताच त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. किती असेल त्याची व्याप्ती? मराठवाडय़ातील काही शहरात ‘मोदी लाओ, देश बचाओ’ चा नारा आता चक्क शंभर रुपयांच्या नोटेवर देण्यात आला आहे!

First published on: 21-09-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stamp of modi lao desh bachao on hundred rupees note