राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१२-१३ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या गटांमध्ये ३१ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यात प्रज्ञा दया पवार, नीरजा, बाबा भांड, मधु मंगेश कर्णिक, संध्या नरे-पवार आदींचा समावेश आहे.
पुरस्कार, साहित्य प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कारप्राप्त लेखक, कंसात पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम या प्रमाणे :-
प्रौढ वाङ्मय (काव्य) – कवी केशवसुत पुरस्कार : प्रज्ञा दया पवार (दृश्यांचा ढोबळ समुद्र), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : अभय दाणी (एरवी हा जाळ), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : शिफारस नाही; प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडुलकर पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङ्मय (कादंबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : आनंद विनायक जातेगांवकर (अस्वस्थ वर्तमान), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : अवधूत डोंगरे (स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट), ५० हजार रुपये ; प्रौढ वाङ्मय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : नीरजा (पावसात सूर्य शोधणारी माणसं), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग. ल. ठोकळ पुरस्कार : गुणवंत मधुकर पाटील (भरळ), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : हेमंत देसाई (बाबू मोशाय)- (सुहाना सफर), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई िशदे पुरस्कार : हृषीकेश पाळंदे (दोन चाकं आणि मी), ५० हजार रुपये;
प्रौढ वाङ्मय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : अनिल पंढरीनाथ सोनार (विश्वसुंदरी सुलभ हप्त्यात), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (चरित्र)- न. चिं. केळकर पुरस्कार : बाबा भांड (लोकपाळ राजा सयाजीराव), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : मधु मंगेश कर्णिक (करुळचा मुलगा), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार : डॉ. हृषीकेश कांबळे (दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा. भा. पाटणकर पुरस्कार : हेमंत खडके (अर्वाचीन कवींचा काव्यविचार), ५० हजार रुपये; प्रौढ वाङ्मय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : संध्या नरे- पवार (तिची भाकरी कोणी चोरली ?), १ लाख रुपये;
प्रौढ वाङ्मय (इतिहास)- शाहू महाराज पुरस्कार : अविनाश दिगंबर फुलझेले (आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (भाषाशास्त्र/ व्याकरण)- नरहर कुरुंदकर पुरस्कार : सुरेश पांडुरंग वाघे (संकल्पना कोश खंड २ ते ५), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (विज्ञान व तंत्रज्ञान) (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : प्रदीपकुमार माने (मुंगी : एक अदभूत विश्व), १ लाख रुपये ; प्रौढ वाङ्मय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) वसंतराव नाईक पुरस्कार : अनिल पाटील (गावगाडा शतकानंतर.), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (दलित साहित्य); -लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार : डॉ. नानासाहेब निकम (जोहार), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन) सी. डी. देशमुख पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङ्मय (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र)- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार : डॉ. मुहम्मद आजम (सुफी तत्तवज्ञान : स्वरूप आणि चिंतन), १ लाख रुपये;
प्रौढ वाङ्मय (शिक्षणशास्त्र)- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : नामदेव शंकर माळी (शाळाभेट), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (पर्यावरण)- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : अतुल देऊळगावकर (विश्वाचे आर्त), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (संपादित/ आधारित)- रा. ना. चव्हाण पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङ्मय (अनुवादित)- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार : सुजाता गोडबोले (भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा), १ लाख रुपये; प्रौढ वाङ्मय (संकीर्ण – क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार : प्रसाद नामजोशी (शॉर्टकट), १ लाख रुपये;
बालवाङ्मय (कविता)- बालकवी पुरस्कार : इंद्रजित भालेराव (गावाकडं), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (नाटक व एकांकिका)- भा. रा. भागवत पुरस्कार : अरुणा भागवत (आनंद फुलवू या), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (कादंबरी)- साने गुरुजी पुरस्कार : ल. म. कडू (खारीच्या वाटा), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (कथा- छोटय़ा गोष्ट, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार : गौरी पटवर्धन (नील आणि प्रिन्स ऑफ पíशया), ५० हजार रुपये ; बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार : आनंद घैसास (आकाश कसे पाहावे), ५० हजार रुपये; बालवाङ्मय (संकीर्ण) ना. धों. ताम्हणकर पुरस्कार : मदन हजेरी (गायबगळा), ५० हजार रुपये; बृहन्महाराष्ट्र पुरस्कार – सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : डॉ. प्रतिभा आठवले (पूर्वरंग-हिमरंग), १ लाख रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2014 रोजी प्रकाशित
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१२-१३ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.
First published on: 25-02-2014 at 06:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government outstanding classics award declared