ग्राहक जागरूकता अभियानांतर्गत कंझ्युमर सर्विस अॅण्ड रिसर्च असोसिएशनच्या सहकार्याने ग्राहकाची होणारी फसगत, आजची सामाजिक स्थिती  आणि आपला ग्राहक म्हणून असणारा दृष्टिकोन या विषयीचे युवापिढीसमोर असणारे प्रश्न चित्राच्या माध्यमातून प्रगट करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून ग्राहक समस्या चित्रकला राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ९ डिसेंबरला होणार असून या चित्राचे ९ आणि १० डिसेंबरला प्रदर्शन आहे.
ही स्पर्धा तीन विभागात विभागली आहे. चित्रकला स्पर्धा ‘ग्राहकांची फसवणूक’ या विषयावर असून दोन गटात होणार आहे. वर्ग ५ ते ७ व वर्ग ८ ते ९ पर्यंत विद्यार्थ्यांकरिता आहे. ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धा ‘जाहिरातीद्वारे फसवणूक’ हा विषय आहे. भित्तीचित्र, घोषवाक्ये स्पर्धा ‘नागरिकांच्या वर्तणुकीमुळे सार्वजनिक स्थळाच्या स्वच्छतेवर होणारे दुष्परिणाम’ हा विषय आहे.
 विजेत्या स्पर्धकास १२ आकर्षक पारितोषिके, प्रसश्तीपत्रे व ६० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी कंझ्युमर सव्र्हिस अॅण्ड रिसर्च असोसिएशन, राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी रोड आंध्र असोसिएशन जवळ रामदासपेठ (०७१२-२५२३१६१), साईकृपा मंगल कार्यालय, रहाटे कॉलनी, धंतोली (सकाळी १० ते १२) आणि प्रदीप पवार, ब्लॉक नं ३५ धनश्री कॉम्प्लेक्स, हरदेव हॉटेलजवळ दुपारी १ ते ५ पर्यंत (९८२२७०१५७३) यावर संपर्क साधावा. स्पधॅत  विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सुरेश अग्रवाल, आनंद मुळे, सुरेश पनके, नीता गडेकर आदींनी केले आहे.