रोटरी क्लब डोंबिवली पूर्वतर्फे आयोजित डोंबिवली ऑलिम्पिकमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दहा खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विविध प्रकारच्या पदकांची लयलूट केली. गेल्या २० वर्षांपासून डोंबिवलीत हे ऑलिम्पिक सुरू आहे.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुभाष कुलकर्णी, सुरेंद्र बाजपेयी, डॉ. उल्हास कोल्हटकर, नरिंदर सिंग, धीरज मिश्रा, अध्यक्ष मनोज प्रधान, संदीप घरत, विश्राम परांजपे, महापौर वैजयंती गुजर या वेळी उपस्थित होते.
सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित या खेळ मेळाव्यात डोंबिवली परिसरातील ७० शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, असे संयोजकांनी सांगितले.