राज्य शासनाच्या सांस्कृिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारपासून येथील परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात सुरू होत आहे. स्पर्धेत १४ नाटय़ मंडळांनी सहभाग नोंदविला असून तीन डिसेंबपर्यंत ही स्पर्धा सुरू राहिल.
पहिल्या दिवशी विजय नाटय़ मंडळाचे ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर  दिग्दर्शित व लिखित ‘सतीचं वृंदावन’ हे नाटक सादर होईल. बुधवारी सन्मित्र मित्रंडळ हे बाबा चिटणीस यांचे ‘दरम्यान’, गुरुवारी मिलिंद मेधणे दिग्दर्शित ‘मन वढाय वढाय’ हे एचएईडब्ल्यूआरसी सादर करेल. शुक्रवारी विक्रम गवांदे दिग्दर्शित ‘रातमतरा’ (शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था), २३ नोव्हेंबर रोजी राजेश शर्मा दिग्दर्शित ‘निवडुंग’ (शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ), रामनाथ माळोदे लिखित व नाना देवरे दिग्दर्शित ‘का वाचवलंस मला?’ (सूर्या शैक्षणिक सामाजिक संस्था), २४ नोव्हेंबरला आदिल शेख दिग्दर्शित ‘शब्दप्रयोग’ (नीलधारा सोशल फाऊंडेशन), २५ नोव्हेंबरला रोहित पगारे दिग्दर्शित ‘दीक्षा’ (क. का. वाघ ललित कला महाविद्यालय), २६ नोव्हेंबरला प्रशांत हिरे दिग्दर्शित ‘दर्द-ए-डिस्को’ (आरएम ग्रुप), २८ नोव्हेंबर रोजी रविकांत शार्दूल दिग्दर्शित ‘सायक्लोन’ (कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय), २९ नोव्हेंबर रोजी राहुल मनोहर दिग्दर्शित ‘मित्राची गोष्ट’ (क्रांतिवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ), ३० नोव्हेंबर रोजी शुभांगी पाठक दिग्दर्शित ‘द जर्नी’ (दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग), २ डिसेंबर रोजी शंतनू चंद्रात्रे दिग्दर्शित ‘प्रेमाचा केओस’ (अग्नेय नाटय़ सेवा), ३ डिसेंबर रोजी मुकुंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘कूस बदलताना’ (लोकहितवादी मंडळ) अशी नाटके सादर होतील.