उत्तर महाराष्ट्रात स्थावर मालमत्ता क्षेत्रात असलेल्या नाशिक येथील ठक्कर डेव्हलपर्सला चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत सहा कोटी ७२ लाख रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षांत याच कालावधीत कंपनीला पाच कोटी ५४ लाख रुपये इतका नफा झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदाच्या नफ्यात २० टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनीची आर्थिक उलाढाल सातत्याने वाढत असून कंपनीला लवकरच २५ वर्षे पूर्ण होणार आहे. कंपनीच्या नाशिक येथे सुरूअसलेल्या प्रकल्पास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.