असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री  डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०११-१२ मध्ये गळितास आलेल्या उसास प्रति टन १०० रुपये विनाकपात तिसरा हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८ नोव्हेंबर रोजी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
सन २०११-१२ च्या गळीत हंगामात कारखान्याने ३.६१ लाख मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.३६ टे साखर उताऱ्याने  ४.४६ लाख िक्वटल साखरेचे उत्पादन केलेले आहे.  या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसास कारखान्याने यापूर्वी पहिला हप्ता टनास २०५० रुपये, दुसरा हप्ता १०० रुपये आणि आता तिसरा हप्ता १०० रुपये असे आतापर्यंत उसाला प्रति मेट्रिक टन २२५० रुपये दिला आहे. तरी संबंधितांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करून येत्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविले असून, ते पूर्ण करण्यासाठी सभासद, उस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक एस.बी. िनबाळकर यांनी या वेळी केले.