मुंबई हे एक सवरेत्कृष्ट वारसा लाभलेले शहर असून या शहराच्या पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ‘पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन’ (पटवा) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बर्लिनमध्ये झालेल्या पर्यटनासंबंधीच्या शिखर परिषदेत एमटीडीसीला हा पुरस्कार देण्यात आला. पर्यटन विभागाच्या सचिन वल्सा नायर सिंग यांनी हा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन’चे महासचिव डॉ. तालेब रिफाई यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्काराचा आम्हाला अभिमान वाटतो. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन प्रसिद्धी कार्यक्रमांना आणखी बळ देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल, असे मत वल्सा नायर यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2015 रोजी प्रकाशित
पर्यटन महामंडळाला पुरस्कार
मुंबई हे एक सवरेत्कृष्ट वारसा लाभलेले शहर असून या शहराच्या पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ‘पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन’ (पटवा) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
First published on: 21-03-2015 at 12:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism corporation awarded