महिला आजही मानसिक गुलामगिरीत आहेत. आदर्शपणाच्या भ्रामक कल्पना मनात बाळगून अन्याय व अत्याचार निमूट सहन करण्याऐवजी महिलांनी जिजाऊ व सावित्रीला स्मरून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास शिकावे, असे मत प्रा. वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.
जिजाऊ व्याख्यानमालेत डोळस म्हणाल्या, की सावित्री व जिजाऊंनी सांगितल्याप्रमाणे आत्मसंरक्षणसुद्धा आपण शिकून घ्यायला हवे, उपासतापास, पोथ्या-पुराणे वाचून शारीरिक व मानसिकरीत्या अशक्त होण्यापेक्षा सशक्त व्हा. उद्याचे जग तुमच्यासाठीच आहे. सूत्रसंचालन रजनीताई पाटील यांनी केले, तर कांचन जाधव यांनी आभार मानले.