भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणा-या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला. तो इतका शक्तिशाली होता की, गॅरेजचे पत्रे उडाले. सात जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांपैकी एक जण तीन वर्षांचा, तर एक तीस वर्षांचा आहे. त्यांची ओळख पटलेली नाही. हा स्फोट गॅरेजमधील गॅस सिलिंडरमध्ये झाल्याचे समजते. स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही. जखमींची ओळख पटली असून त्यांची नावे पुढील प्रमाणे- वाजीद खान, शेख युसूफ अहमद, महंमद अकबर, विजू रमण, विकास रमण पवार, महंमद फारूख, शिराज महंमद.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
औरंगाबादमध्ये गॅरेजमधील स्फोटात दोन ठार, तीन जखमी
भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणा-या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला.

First published on: 03-02-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed three injured in blast in garage at aurangabad