उल्हासनगर पोलीस ठाण्याचा लाचखोर पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण व त्याचा साथीदार रमेश रामचंदानी यांना कल्याण न्यायालयाने काल दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खंडणी, तडीपारीच्या गुन्ह्य़ात अडकवण्याची धमकी देऊन योगिराज देशमुख यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षक महेंद्र ओंकार चव्हाण आणि त्याचा खासगी चालक रमेश रामचंदानी या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. पोलिसांनी महेंद्र व रमेशला कल्याण न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील दीपक तरे यांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करीत १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.