अन्विती मुंबई कै. प्रकाश नाईक स्मरणार्थ वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आयोजित एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत गोरेगावच्या अस्तित्वच्या ‘उंच माझा झोका गं’ या एकांकिकेला कै. प्रकाश नाईक स्मरणार्थ स्मृतिचिन्ह आणि कै. शरदचंद्र तेंडुलकर स्मृतिप्रीत्यर्थ पाच हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला. यवनिका थिएटर्सच्या ‘बडे भाईसाहब’ द्वितीय आणि संस्कार मालवणच्या ‘हाक’ ला तिसरे बक्षीस मिळाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गंगाराम गवाणकर, श्रीनिवास नार्वेकर यांनी काम पाहिले. डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या स्पर्धेची सांगता सुरेल पसायदानाने झाली.