डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग, तसेच आयसीएसएसआर, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान ‘रीसर्च मेथोडोलॉजी’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणास अनुसूचित जाती-जमातीचे, पीएच. डी.चे सामाजिकशास्त्र शाखांचे विद्यार्थी पात्र असतील. यात प्रवेश विनामूल्य असेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे. एकूण ३० प्रशिक्षणार्थीना प्रवेश दिला जाणार आहे. उपलब्धीनुसार प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था विद्यापीठाच्या अतिथिगृहात नियमाप्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तज्ज्ञ मार्गदर्शक लाभणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक आयसीएसएसआरच्या पश्चिम विभागीय केंद्राचे संचालक प्रा. गौतम गवळी आहेत. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. पात्र व इच्छूक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ६६६.ुंे४.ल्ली३  या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. अर्ज सूचनेनुसार भरून १९ नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात देण्यात यावा, असे आवाहन डॉ. वैशाली खापर्डे यांनी केले आहे.