आजचा दिवस आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता. कसली धम्माल आली माहितेय. आज एक तर बसमधून उतरताना तिनं मला एक छान लूक दिला. अहाहाहा ती नजर. इतकं प्रेमाने आजवर माझ्याकडे कुणी पाहिलं नसेल. यामुळे आजचा दिवस एकदम झक्कास जाणार हे सकाळीच कळलं होतं मला. नाहीतर कालचा दिवस. फेसबुकवरही काही सापडलं नाही. तिनं सगळं ब्लॉक करून ठेवलंय. साधा फोटोही पाहता आला नाही. पण आजचा दिवस एकदम बेस्टच होता. बसमधून उतरून माझ्या कॉलेजच्या रस्त्याने जात असताना तिनं हाय केलेला तो मुलगा दिसला. ताबडतोब त्याला गाठायचं ठरवलं आणि धावायला सुरुवात केली. त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हटलं, ‘तू समृद्ध विद्यामंदिरचा ना.’ त्यानं हो म्हटल्यावर कसला जीवात जीव आला माहितेय. मग थोडा शाळेचा विषय रंगला आणि मग मी हळूच तू त्या मुलीला कसा ओळखतोस. असं विचारलं. तो त्याची बढाई सांगायला लागला. त्याच्या मित्राची बहीण आहे म्हणे ती. लहानपणापासून एकत्र आहेत वगैरे. या सर्वात खरेतर मला इंटरेस्ट नव्हता. पण ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है.’ तसंच ऐकून घ्यावं लागला मला सगळं. त्याशिवाय नंबर मिळाला नसता. त्याची बडबड काही थांबेना. मग मी थेट मुद्दय़ाला हात घातला आणि थेट ‘तिचा’ नंबर मागितला. त्याला आधी काही कळलेच नाही. मग फार कारणमीमांसेत न पडता त्याने पटकन नंबर दिला. बस्स. तिचा नंबर सेव्ह केला आणि तो थेट फेव्हरिट नंबर्समध्ये अॅड केला. आता पुढे काय? असो आता झोपूयात. उद्या बस चुकून चालणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
नंबर मिळाला
आजचा दिवस आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता. कसली धम्माल आली माहितेय. आज एक तर बसमधून उतरताना तिनं मला एक छान लूक दिला.
First published on: 07-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day special