मालाची आवक वाढल्याने सांगली, मिरजेच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. आठ दिवसांपूर्वी असणाऱ्या दरापेक्षा सध्याचे दर ५० टक्क्यांहून कमी झाल्याने शेतकरी मात्र आíथक अडचणीत सापडला आहे.
    सांगली, मिरजेच्या बाजारात स्थानिक परिसरातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात शहराशेजारील गावांमध्ये म्हैसाळ कालव्याचे पाणी गतवर्षी फिरल्याने विहिरींना बऱ्यापकी पाणी आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली आहे. हा भाजीपाला एकाच वेळी बाजारात येऊ लागल्याने दर कोसळला आहे.
    टोमॅटोचा बाजरातील दर ५ रुपये किलो तर वांग्याचा दर १० रुपये किलो झाला आहे.  कोथिंबीर, मेथी या भाज्या ५ रुपयेला तीन जुडय़ा या दराने किरकोळ विकल्या जात आहेत.  भेंडी, हिरवा वाटाणा, मिरची, गवार, गाजर, कोबी, फ्लॉवर या सर्वच भाज्यांचे दर निम्म्याहून कमी झाले आहेत.
    मिरजेतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि सांगलीतील शिवाजी मंडईत लिलावामध्ये सध्या मिळणारे दर आणि कंसातील गेल्या सप्ताहातील दर असे आहेत. प्रति १० किलो वांगी ५० ते ८० (३५० ते ४००), टोमॅटो ५० ते ६० (१५० ते २००), दोडका व काकडी २०० ते २५० (३५०), भेंडी २५० ते ३०० (४००), मटार १५० ते १८० (३५० ते ४००), हिरवी मिरची १०० ते १५० (२५०), गवारी ३०० ते ३५० (५०० ते ६००), घेवडा १५० ते २०० (३०० ते ३५०) सिमला मिरची १०० ते १२० (२५० ते ३००), गाजर १०० (२००), फ्लॉवर १२ नगाचे पोते १०० (५००), दुधी भोपळा डझन ५० ते ६० (८० ते ९०), मेथी, कोिथबीर पेंडी प्रतिशेकडा ३०० (५०० ते ६००) असे दर आहेत.