दिंडोरी मतदारसंघातील कळवण तालुक्यात मागील निवडणुकीत दहा टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील १३ गावांमधील मतदान केंद्रापैकी १३ केंद्रावर सरासरी कमी मतदान झाल्याने त्याठिकाणी जनजागृती करण्यात आली.
प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कळवण येथे रामनगर, गांधी चौक, संभाजी नगर, गणेश नगर तसेच मोकभणगी, भेंडी, मानूर आदी गावांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. फलक तयार करण्यात आले असून ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा’, ‘सर्वाची आहे ही जबाबदारी मत देणार नर-नारी’, ‘लोकशाहीचा हाच आधार’, ‘२४ एप्रिल मतदान का दिन है’ असे विविध संदेश त्यावर लिहिण्यात आले आहेत.
यावेळी सहाय्यक उपजिल्हा अधिकारी आस्तिक पांडे,े तहसीलदार अनिल पुरे, उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ, डॉ. रवींद्र सपकाळे आदी उपस्थित होते. मतदान करणे हा आपला हक्क असून ते आपण केले पाहिजे, मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन तास वेळ वाढवून दिली आहे. आपण मतदान करून आपला हक्क बजवावा असे आवाहन प्राां पांडय़े यांनी मतदान जागृती अभियानात केले. यावेळी तहसीलदार अनिल पुरे यांनी मतदान कसे करावे याबाबत माहिती दिली,