कल्याणमधील प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका लक्ष्मी बोरकर यांनी प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार पालिकेत केल्यामुळे संतप्त झालेल्या किशोर भालेराव या नागरिकाने बोरकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी किशोर भालेराव याला अटक करून नंतर त्याची जामीनावर सुटका केली. प्रभागात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने त्याची तक्रार नगरसेविका बोरकर यांनी पालिकेत केली होती. त्याचा राग येऊन भालेराव हा बोरकर यांच्या कार्यालयात आला व त्यांना उपस्थित नागरिकांसमोर अश्लील भाषेत शिवागाळ व धमकी देऊन निघून गेला, असे पोलिसांनी सांगितले. गेल्याच आठवडय़ात डोंबिवलीत एका नगरसेविकेला पालिकेच्या सफाई कामगाराने धमकी दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने नगरसेविकेला धमकी
कल्याणमधील प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका लक्ष्मी बोरकर यांनी प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार पालिकेत केल्यामुळे संतप्त झालेल्या किशोर भालेराव या नागरिकाने बोरकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांना अश्लील
First published on: 08-01-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warn to corporator for giving complain of illigal construction