तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे, असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. लांगोरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व ग्रामविकास संस्थेतर्फे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ग्रामविकास सचिव नरहरी शिवपुरे, बी.आर.जी.एफ. जिल्हा समन्वयक एल. के. गांगे, सहायक प्रकल्प संचालक पी. आर. मनचंदा उपस्थित होते. शिवपुरे म्हणाले, की जलपुनर्भरणामुळे पाणीटंचाईवर मात व नैसर्गिक साधनांचा ऱ्हास टाळण्यास मदत होईल.
राज्यातील सर्व धरणांच्या साइट संपल्या असून या पुढील काळात साइटअभावी धरणे बांधणे शक्य होणार नाही. सार्वजनिक व वैयक्तिक जलपुनर्भरण, शेततळी, वनराई बंधारे, तलावातील गाळ काढणे, सार्वजनिक इमारतीचे जलसंचय करून पुनर्भरण केल्यास काही प्रमाणात तीव्र टंचाईवर मात करणे शक्य असून, यासाठी नैसर्गिक संसाधन साक्षरता वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुवर्णा मोहिते यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
जलपुनर्भरण ही आजच्या काळाची गरज- लांगोरे
तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे, असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. लांगोरे यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व ग्रामविकास संस्थेतर्फे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
First published on: 30-01-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water refilling is needed for todays life langore