अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, संबंधित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात या तरुणाने शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती दिल्यानंतर या तरुणाविरुद्ध आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
संबंधित मुलगी व तरुण हे दोघेही कर्नाटकातील आहेत. सचिन उल्हप्पा मदने (वय २२, हंगरगा, तालुका देगलूर, जिल्हा बीदर, कर्नाटक) व संबंधित १६ वर्षीय मुलगी हे दोघे सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरातून पळून गेले होते. शहराच्या सिडको सोळावी योजना भागातून हे दोघे पळून गेल्यानंतर १२ जूनला मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. ही मुलगी आपल्या मावशीकडे राहावयास आली असताना मदने याने तिला फूस लावून पळवून नेले होते.
पोलिसांनी दोघांना पुणे जिल्ह्य़ातील चाकण येथून १० नोव्हेंबरला ताब्यात घेतले. मदनेविरुद्ध पोलिसांनी ३५३ व ३६६ कलमान्वये गुन्हा नोंदविला. दि. ११ नोव्हेंबर रोजी त्याला येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, संबंधित मुलीने मदने याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचे (३७६) कलम लावून गुन्हा नोंदविला. त्यानंतर मदनेला आता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. परप्रांतीय युगुलाच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण शहरात मोठा चर्चेचा विषय झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला कोठडी
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, संबंधित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात या तरुणाने शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती दिल्यानंतर या तरुणाविरुद्ध आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
First published on: 16-11-2012 at 04:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Younger girl robbery case sespect were gets jail