स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाची ध्वजा सातासमुद्रापलीकडे फडकवली. समाज आणि धर्मापुढील समस्यांवर युवकांनी चिंतन करावे, असा संदेश त्यांनी दिला. आजच्या भारताला सक्षम करावयाचे असेल तर प्रत्येक युवकाने स्वामी विवेकानंदाच्या विचारांपासून  प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
स्वामी विवेकानंदाच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या वतीने यवतमाळात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, नगरसंघचालक सुखदेव ढवळे, शरद कळणावत, डॉ. प्रकाश नंदुरकर, गुरूदेव सेवा मंडळाचे अशोक ठाकरे, पतंजली योगपीठाचे त्र्यंबक हिरोडे, श्रीधर कोहरे, राजू निवल आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंदांनी वेद व धर्माच्या बाबतीत चिंतनानंतर धर्म, रितीरिवाज, संस्कृती आणि संस्कार जर समस्यांच्या निराकरण करू शकत नसतील तर ते केराच्या टोपलीत टाकले पाहिजे, असे सांगून नवभारत निर्माणासाठी स्वामीजींनी नवा विचार युवकांपुढे ठेवला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे अचूक लक्ष्य वेधण्यासाठी स्वामीजींच्या अनुशासन मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी शिवाजी मदानावरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष योगेश गढीया, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, डॉ. प्रकाश नंदुरकर, प्रांत सहसंयोजक सुभाष लोहे, डॉ. शरद कळणावत, दिवाकर पांडे, राजू डांगे, मनोज इंगोले, अमोल ढोणे, बाळासाहेब चौधरी, नाना गाडबले, सुरेश कैपिल्यवार आदी या प्रसंगी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदाची वेशभूषा केलेले अनेक विद्यार्थी शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. भजन मंडळ, बंॅड पथक व विविध देखाव्यांचा समावेश शोभायात्रेत होता. शेवटी आकर्षक रथात असलेल्या स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन ठिकठिकाणी घेण्यात येत होते. जिल्हा संयोजक विवेक  कवठेकर, सत्पाल सोहळे, दीपक देशपांडे, नितीन खच्रे, नितीन गिरी, अविनाश लोखंडे आदींनी सहकार्य केले.