तंत्रज्ञान अवतीभोवती घेऊन वावरणाऱ्या तरुण पिढीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष अपेक्षा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रशासन गतिमान करणे व त्या आधारे अपेक्षित विकास त्यांनी घडवून आणावा, अशी तरुण पिढीची भावना आहे. अगदी खेडोपाडी मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱ्या तरुणाला त्या माध्यमातून त्यांचा कामे लवकर व कमी कष्टात व्हावी असे वाटल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे अर्ज लवकर भरले जावेत, शिष्यवृत्तींची कामे लवकर व्हावीत, विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात माराव्या लागणा-या खेपा कमी होऊन ही कामे ऑन लाईन व्हावी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी करावे लागणारे ई-मॅपिंग असो की तरुण शेतक-यांपर्यंत आधुनिक सुविधा नेणे असो, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर फडणवीसांच्या कारकीर्दीत व्हावा अशी अपेक्षा राहणार आहे. दीर्घ काळापासून राजकारण करणाऱ्या फडणवीसांची स्वत:ची प्रतिमा स्वच्छ असल्याने ते स्वच्छ तरीही कार्यक्षम प्रशासन देतील अशी अपेक्षा तरुणांना आहे. स्वत:च्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, चर्चा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला व असा प्रतिसाद देणारा वर्ग हा प्रामुख्याने तरुण व नवमतदार होता. आपल्यातीलच वाटणारा, विकासाची भाषा बोलणारा, तंत्रज्ञानाचा वापर करणारा नेता नव्या मतदाराला आवडतो हे मोदींच्या उदाहरणावरुन लोकसभेच्या वेळी लक्षात आले होते. तीच बाब फडणवीसांना लागू होते. तंत्रज्ञानाचा व आधुनिक साधनांचा उपयोग करीत स्वच्छ प्रशासन देणे व नागपूर- विदर्भाचा विकास घडवणे या अपेक्षा विदर्भातील तरुण मतदार नव्या मुख्यमंत्र्याकडून बाळगून आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2014 रोजी प्रकाशित
तरुण देवेंद्रकडून तरुणांना अपेक्षा
तंत्रज्ञान अवतीभोवती घेऊन वावरणाऱ्या तरुण पिढीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष अपेक्षा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रशासन गतिमान करणे व त्या आधारे अपेक्षित विकास त्यांनी घडवून आणावा, अशी तरुण पिढीची भावना आहे.
First published on: 31-10-2014 at 02:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth expectations from young devendra fadnavis