भारतातील इतर शहरांचे अंतर मोजण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या ठिकाणी स्तंभ रोवण्यात आला आणि जो देशाचा भौगोलिक मध्यबिंदू आहे. त्या झिरो माईल परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपूरचे देशातील वेगळेपण ठसठसीतपणे देशाच्या नकाशावर दिसून येणार आहे.
लष्कराच्या ताब्यातील सीताबर्डी किल्ला महापालिकेला मिळावा. यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.  संरक्षण मंत्र्याच्या नागपूर भेटीच्या वेळी नागपूर आणि विदर्भातील संरक्षण विभागाच्या जमिनीसंदर्भातील समस्यांची जत्री वाचण्यात आली. संरक्षण कायद्यामुळे लोकांनी मागणी केली आणि मंत्र्यांनी आश्वासन दिले, असे काही होत नाही. यातून मार्ग काढत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी महापौर, पालकमंत्र्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यात महापौरांनी आणखी एक प्रमुख मागणी केली. ती म्हणजे मॉरीस कॉलेज टी-पाईन्टजवळ उभारण्यात येत असलेल्या कारंज्याला परवानगी देण्याची. शहराचे सौंदर्यीकरण आणि पयर्टनस्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने उचलण्यात येत असलेल्या पावलांचा एक प्रमुख टप्पा आहे.
‘झिरो माईल’ परिसर विकसित करून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ब्रिटिशांनी देशातील शहरांमधील अंतर मोजले होते. शहराचे अंतर मोजण्यासाठी ज्या ठिकाणी स्तंभ रोवला. देशाच्या भौगोलिक मध्यबिंदू असल्याने त्याला झिरो माईल असे नाव देण्यात आले.
या शहराला द्वितीय राजधानी करण्याची योजनाही त्यांची होती. हा सर्व इतिहास आणि शहराचे वेगळेपण. यामुळे झिरो माईल परिसराचे सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे, असे महापौर प्रवीण दटके म्हणाले.
सध्या झिरो माईल परिसरात इमारती आहे. त्या इमारती राज्य सरकारच्या आहेत. त्या रिकाम्या करण्यात येतील. तशी तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. स्टारबस पार्किची जागादेखील यासाठी घेण्याची योजना आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ, लँडस्केपिंग, नागपूरचा इतिहास सांगणाऱ्या गोष्टींचा समावेश राहणार आहे. परंतु येथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाणार आहे. असोएिशन ऑफ इंटेरिअर डिझाईनर यांना तसा प्रस्ताव तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम डिझाईन निवडली जाईल. त्यानुसार झिरो माईलचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

संपूर्ण देशात नागपूरची वेगळी ओळख सांगणाऱ्या झिरो माईल परिसर विकसित करण्यात येणार आहे. येथे आंतरराष्ट्र दर्जाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनला डिझाईन तयार करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी स्पर्धा आयोजित केली जाणार असून, त्यातून डिझाईन निवडला जाईल.
– प्रवीण दटके, महौपार

सुधार प्रन्यास झिरो माईल विकसित करणार आहे. यात कुठल्याही बांधकाम होणार नाही तर संपूर्ण सौंदर्यीकरण करण्यात येईल. यात वेस्टर्न कोल्डफिल्ड लि.ने रस दाखवला आहे.
– सुनील गुज्जलवार,
अधीक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यास