या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयल एन्फिल्ड नावाचा वादळ, असा उल्लेख मागील लेखात केला होता. वादळाची उपमा बुलेटला देण्यामागे कारणदेखील आहे. बुलेट दिसायला दमदार, तो खास आवाज, रुबाब यामुळे ही उपमा दिली नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांत रॉयल एन्फिल्डची झालेली प्रगती ही दुचाकी वाहन उद्योगातील भरीव कामगिरीच म्हणावी लागले. कारण, कोणतीही जाहिरात विशेषत: बुलेट या ब्रॅण्डसाठी कंपनीने िपट्र, रेडिओ वा टीव्ही केल्याचे मला आठवत नाही. कदाचित तुम्ही सांगू शकाल! अर्थात, तीही नाही कारण हिमालयन या मोटरसायकलचीच जाहिरात कंपनीने केली आहे. बुलेट ३५० क्लासिक ही मोटरसायकल त्यामुळेच रॉयल एन्फिल्डसाठी वादळ आहे.

कंपनीने देशातील युवावर्ग डोळ्यांपुढे ठेवून बुलेटमध्ये रचनात्मक व इंजिनमध्ये बदल केले. त्यामुळे बुलेट अधिक आकर्षक झाली. कंपनीने बुलेट ३५० क्लासिक ही तरुणवर्ग व बुलेट घेण्याची इच्छा असणाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून तयार असली तरी रेट्रो डिझाइन कायम ठेवले असले तरी त्यास आधुनिक तंत्रज्ञाची जोड दिली आहे. क्लासिक ३५० चे डिझाइन हे १९४० च्या दशकातील बुलेटशी मिळतेजुळते असून, रेट्रो लुक जपण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच इन्स्ट्रमेंटल कन्सोल साधे आहे. स्पीडोमीटर अ‍ॅनॅलॉग असून, ओडोमीटर व बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे. सीटिंगचा पर्याय सिंगल व डबल सीट असा देण्यात आला आहे. साडेतीनशे सीसीचे १९.८ बीएचपीचे २८ न्यूटनमीटर टॉर्कचे इंजिन दिले आहे. तसेच, ट्विन स्पार्कप्लग व फाइव्ह स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. त्यामुळेच बुलेटचा पिकअप जाणवतो. अर्थात, बुलेटचे वजन सुमारे दोनशे किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ही मोटरसायकल जोरात चालविण्याचे प्रयत्न करण्याचे धाडस करू नये. कंपनीने सुरक्षिततेसाठी डिस्कब्रेक दिला आहे. मात्र, इमर्जन्सी ब्रेक दाबावा लागल्यास बुलेट आपल्याला पेलावणार का, याचा विचार तो पळविताना करावा. बुलेट ही रेसिंग वा वेगाने चालण्यासाठी बनविण्यात आलेली मोटरसायकल नाही. बुलेट क्रूिझग स्पीडने चालविल्यास उत्तम रायिडगचा अनुभव येतो. तसेच, मोटरसायकलवर नियंत्रण मिळविणेही सोपे होते.

शहरात सरासरी प्रति लिटर ३०-३५ किमी मायलेज मिळते. हायवेवर ते ४०-४२ किमीपर्यंत जाते. इंजिनमध्ये भरपूर ताकद असल्याने लाँग रायिडगला बुलेट ३५० नक्कीच चांगली आहे. कारण, यावर अतिरिक्त सामान लादून नेता येऊ शकते. तशा अ‍ॅक्सेसरीजही उपलब्ध आहेत. रात्रीची दृश्यमानता वाढावी यासाठी हॅलोजन लॅम्प दिला आहे. बुलेटची सवय असल्यास लाँग ड्राइव्हला हेवीनेस जाणवत नाही. त्यामुळे लाँग ड्रायिव्हगची आवड असणाऱ्यांनी दमदार मोटरसायकल म्हणून बुलेट ३५० क्लासिक नक्कीच एक पर्याय आहे. कंपनीने एलईडी टेल लाइट, टर्न ऑफ इंडिकेटर, रिअर डिस्क्रब्रेकसह एबीएस देण्याची गरज आहे. बहुतेक बुलेट घेणारे नवे ग्राहक हे शहरी आहेत. कारण, शहरात बुलेट आपल्याकडे असणे हे आजही स्टेटस सिम्बॉल आहे. त्यामुळे बुलेटकडे अजूनही कुतूहलाने पाहिले जाते. प्रत्यक्षात शहरातील ट्रॅफिकमध्ये बुलेट चालविणे सोपे नाही. कारण, वजन अधिक असल्याने ही मोटरसायकल भार असल्याची भावना काही वेळा मनात निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण बुलेट नक्की कशासाठी म्हणजे स्टेटस सिम्बॉल, वीकेंड ड्रायिव्हग की कम्युटिंगसाठी घेणार आहोत, याचा विचार नक्की ती खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाने करायला हवा.

बुलेट ३५० क्लासिक ही रॉयल एन्फिल्डच्या बुलेट परिवारातील सर्वात यशस्वी मोटरसायकल असून, यामुळे कंपनी यशाची नवी शिखरे गाठत आहे. २०१५-१६ या आíथक वर्षांत कंपनीने एकूण पाच लाख युनिटची विक्री केली होती. २०१६-१७ या आíथक वर्षांत त्यात ३१ टक्के वाढ होऊन कंपनीने ६.६ लाख युनिटची विक्री केली. रॉयल एन्फिल्डचा विक्रीवाढीचा वेग हा देशातील अन्य कोणत्याही दुचाकीच्या कंपनीच्या विक्रीच्या तुलनेत काही पटीने जास्त आहे. त्यामुळेच रॉयल एन्फिल्डची बुलेट ही देशातील मोटरसायकल विश्वातले वादळच आहे. क्लासिक ३५० नक्कीच एक चांगली बुलेट आहे. पण, ती घेण्यामागचा हेतू आपला स्पष्ट असल्यास नंतर पुन्हा विचार करावा लागणार नाही, हे नक्की.

obhide@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield bullet royal enfield bullet firing
First published on: 19-05-2017 at 00:55 IST