* माझे मासिक रिनग दीड ते दोन हजार किमीचे आहे. मला सिआझ ही कार आवडली आहे. मी सिआझचे पेट्रोलचे टॉप मॉडेल घेऊ की डिझेलचे?
– मयुरेश धाक्रस
* ड्रायिव्हिंग फक्त शहरापुरताच मर्यादित असेल, तर पेट्रोल कार खूप महाग पडेल. तुम्ही डिझेल गाडी घ्यावी. पिकअप थोडा कमी असेल, परंतु स्पीड खूप असेल आणि गाडी व्हायब्रेट होत नाही. तुम्ही एसएचव्हीएस डिझेल सिआझ हे मॉडेल घ्यावे.
* माझे बजेट साडेचार लाख रुपये आहे. मी पेट्रोलवर चालणारी गाडी वापरू की डिझेलवर? कृपया सांगा. माझे काम शेतीचे असल्याने बहुपयोगी गाडी सांगा.
– पाडुरंग नारायणकर, श्रीरामपूर
* पेट्रोलवर चालणारी गाडी केव्हाही चांगली. मेन्टेनन्सच्या बाबतीत तीच योग्य ठरते. तेव्हा तुम्ही शक्यतो पेट्रोलवर चालणारी गाडीच बघा. तुमच्याकडे सध्या मारुती ८०० आहेच. तुम्हाला अधिक योग्य ठरणारी गाडी मग टाटांची आहे. याच बजेटमध्ये टाटांची इंडिका येऊ शकते किंवा अधिक खर्च करायची तयारी असेल तर मिहद्राची क्वांटोही तुम्ही घेऊ शकता. मिहद्रा आणि टाटाच्या गाडय़ा जास्त दणकट असतात.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com